महाराष्ट्र

शिंदखेडा येथील जनता हायस्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा येथे क्रांतीसुर्य बोधिसत्व घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 

संस्थाध्यक्ष मनोहर गोरख पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे खजिनदार देवेंद्र पोपटराव बोरसे, संचालक प्राध्यापक जितेंद्र गोरख पाटील, प्राचार्य एम डी बोरसे, पर्यवेक्षक उमेश देसले, ज्येष्ठ शिक्षिका एस एस बैसाने, एस एस पाटील आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रम प्रसंगी बाबा साहेबांचा जीवनपट व त्यांनी केलेले कार्य कु भूमिका रवींद्र पिंपळे व विराज दिपक कुमार पाटोळे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांसमोर मांडले तसेच  डि के सोनवणे यांनी बुद्ध वंदना गाऊन बाबासाहेबांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार ए टी पाटील यांनी मानले.

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे