टेंभे(वरचे) रस्ता काँक्रीटीकरण लोकार्पण सोहळा संपन्न
सटाणा (संभाजी सावंत) वरचे टेंभे येथील गावांतर्गत रस्ता काँक्रीटीकरणाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
महाराष्ट्र शासनाच्या मुलभुत सुविधा २५/१५ या योजनेतून वरचे टेंभे गावात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप अहिरे यांच्या प्रयत्नांतुन रस्ता काँक्रीटीकरण काम करण्यात आले आहे. या कामाचा लोकार्पण सोहळा तसेच वरचे टेंभे पंचक्रोशीतील विधवा महिला भगिनींना साडी वाटप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप अहिरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सम्राट काकडे, जिल्हा सरचिणीस चारुदत्त खैरनार, नामपूर शहराध्यक्ष मेघदीप सावंत, जिभाऊ कापडणीस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुयोग अहिरे, अनिल बोरसे, समाधान अहिरे, दत्ता वाघ, भुषण वाघ, विजय आहिरे, संदिप आहिरे, मनोहर आहिरे, आबा आहिरे, पंडित पाटील, पंडित बोरसे, सरपंच किशोर खरे, देवदत्त बोरसे, बापू डांगे अदी उपस्थित होते.