कोल्हापुरातील विजयाचा मुक्ताईनगरमध्ये महा-विकास आघाडीतर्फे अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा
मुक्ताईनगर (सचिन झनके) कोल्हापूर येथील विधानसभा पोट निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार जयश्री ताई जाधव यांनी विजय संपादन केल्यानंतर मुक्ताईनगरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज हवाई अतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी विभाग उपाध्यक्ष डॉ.जगदीश दादा पाटील, प्रदेश प्रवक्ते ॲड.अरविंद गोसावी, मुक्ताईनगर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दिनेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष यु डी पाटील, छोटूभाऊ भोई शिवसेना तालुकाप्रमुख, प्रवीण चौधरी (आमदार चंद्रकांत पाटील यांचे स्वीय सहाय्यक), राजू जाधव (तालुका कार्याध्यक्ष) बि.डी गवई ज्येष्ठ नेते, ॲड.राहुल पाटील (तालुका उपाध्यक्ष) निखिल चौधरी, बाळू भाऊ कांडेलकर, सुरेश भाऊ भोलाणे, निलेश भालेराव (sc विभाग तालुकाध्यक्ष) रवीभाऊ जयकर(शहराध्यक्ष), समाधान पाटील गुरुजी, जफर खान, आलम शहा, शेख रईस, शेख खलील, नबु जमदार, राजू वानखेडे, नाना बोदडे, वसीम शेख, अरिफ रब्बानी, तसेच असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


