गुन्हेगारीमहाराष्ट्र
फागणे येथील पतसंस्थेने गंडवल्याप्रकरणी संचालकासह एजंटची पोलीस कोठडीत रवानगी
धुळे : शहरापासून जवळ असलेल्या फागणे येथील श्री गुरुदत्त पतसंस्थेने अधिक व्याज व परताव्याचे आमिष दाखवून सुमारे १३ ठेवीदारांना २३ लाख ९६ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी पतसंस्थेच्या ९ संचालकांवर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
या प्रकरणी पोलिसांनी संचालक योगेश्वर पाटील व एजंट विनायक सूर्यवंशी यांना अटक केली होती. या दोघांना शनिवारी दुपारी न्यायालयात उभे केले असता. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तसेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग वर्ग करण्यात आला आहे. देवपुरातील बिजली नगरातील रहिवासी तथा आयटीआयमधील सेवानिवृत्त निदेशक युवराज नथ्थू भामरे वय ६० यांनी याविषयी तक्रार दिली होती.