जळगाव जिल्हा

रुईखेडा गावात लाल परीचे पूजन

मुक्ताईनगर (शैलेश गुरचळ) आज रुईखेडा येथे सकाळी ८ वाजता येणारी मुक्ताईनगर ते मलकापूर महामंडळाची लाल परी लोकांना दिसली आणि लोकांना खूप आनंद झाला. कित्येक महिन्यापासून बंद असलेली लाल परी आज सुरू झाली तेव्हा रुईखेडा येथे सरपंच उषा गुरचळ यांनी महामंडळाच्या बसला हार टाकून पूजन केले. त्या वेळी चालक गजानन पाटील आणि वाहक चंद्रकांत सपकाळ यांचे सुद्धा औक्षण करून फुल हार घालण्यात आले. यावेळी उपस्थित ग्राम. सदस्य वासुदेव बढे, अजय गुरचळ, निलेश गुरचळ व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे