सतेज क्रीडा मंडळामार्फत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन
भुसावळ (प्रमोद बावस्कर) सतेज क्रीडा मंडळ भुसावळ आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ज्ञानेश्वर चषक 2022 संपन्न झाला. स्पर्धेचे उद्घाटन राजू सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातून 22 संघांचा समावेश होतात. त्याच बरोबर मध्य प्रदेश राज्यातून देखील संघाचा समावेश झाला. संघाचे साखळी पद्धतीने सामने घेण्यात आले. सदर स्पर्धा मॅट खेळविण्यात आली. अंतिम सामने सामन्याचा निकाल अंतिम ठरून त्यात तृतीय क्रमांक भुसावळ येथील जय मातृभूमी संघ द्वितीय क्रमांक कैलास क्रीडा मंडळ जळगाव व प्रथम क्रमांक महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ जळगाव यांनी पटकावला कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर चषक व रुपये 21000 पारितोषिक महर्षी वाल्मिक क्रीडा मंडळ जळगाव यांना करण्यात आले. तसेच द्वितीय पारितोषिक रुपये 15 हजार रोख व स्मृतिचिन्ह देऊन रोहन सूर्यवंशी यांच्या हस्ते कैलास क्रीडा मंडळ जळगाव यांना देण्यात आले.
तसेच प्रा डॉ सुनील नवे सर यांच्या हस्ते तृतीय क्रमांक रुपये 11000 जय मातृभूमी क्रीडा मंडळ यांना प्रदान करण्यात आले. यावेळी मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी युवकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर सुनील नवे, पुरुषोत्तम नारखेडे, अनिकेत पाटील, रणजीत सिंग, राजपूत, रोहित सूर्यवंशी, उपस्थित राहिले. या कार्यक्रमाला आर एस ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचे अनमोल सहकार्य लाभले. भुसावळ शहरांमध्ये सतेज क्रीडा मंडळामार्फत प्रथमच राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहाने पार पडल्या.


