जामनेर टाकळी खुर्द ग्रामपंचायतमध्ये लाखोंचा भ्रटाचार उघड
जामनेर (ईश्वर चौधरी) जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द गावातिल सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने भ्रटाचार केल्याचे उघड़ झाला. जामनेर तालुक्यातील टाकळी खुर्द येथील ग्रामस्थांनी 14व्या वित्त आयोगाच्या खर्चाची व कामाची माहिती मागवली असता उपसरपंच यांनी अपहार केल्याचे उघडकीस आले.
जामनेर गटविकास अधिकारी यांनी स्थानिक ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटिस बजावली असुन उपसरपंच यांच्या वर 1959 च्या कलम 39 (1) नुसार कारवाई केल्याची प्रत मुख्याधिकारी जळगाव जिल्हा परिषद येथे पाठवली आहे. ज्यानी ह्या प्रकार उघड केला त्याच्या म्हणण्यानुसार १४ वित्त आयोगाची कोणतीच कामे गावात प्रतेक्ष झालेली नाही फक्त कागद पत्री कामे दाखऊन शासनाची व गावाची फसवणूक केली आहे. या मध्ये शाखा अभियंता जी. व्ही.पाटील यांचा देखील हात असल्याचे बोलले जात आहे कारण १४ वित्त आयोगतून झालेल्या कामांचे प्रमाणके, बिले, मोजमाप पुस्तिका, मागितल्या असता त्यांनी ६ महिने होऊन सुद्धा अद्याप पर्यंत कोणतीच माहिती पुरविली नाही गट विकास अधिकारी यांनी त्यांना पत्र सुद्धा दिले मात्र ते शासनाचे कोणतेच नियम पडताना दिसत नाही.
या वरून असे लक्षात येते की हे अधिकारी सुद्धा या मध्ये सामील आहे. तसेच सध्याचे उपसरपंच यांनी वेळोवेळी ग्रामपंचायत चा पैसा हडप केल्याचे दिसत आहे. यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ६/७ वेळेस चेक स्वरूपात ग्रामपंचायतिचा पैसा हडप केल्याचे बँक स्टेटमेंट मध्ये दिसत आहे. त्या मुळे त्यांनी गावाच्या विकासासाठी आलेले पैसे हे स्वतःच्या विकासासाठी वापरलेले दिसत आहे. या मध्ये सरपंच व ग्रामसेवक याच्या सही शिवाय हे पैसे निघत नाही त्या मुळे यांच्यावर सुद्धा कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे व यांना पदावर राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही त्या मुळे गट विकास अधिकारी यांनी यांना तत्काळ पदावरून कमी करून प्रशासक नेमणूक करावी अशी सुद्धा मागणी होत आहे.