अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला ; तपासाला सुरुवात
धुळे (करण ठाकरे) एक अनोळखी महिला पांझरा नदीकिनारी गणपती मंदिराजवळ बेवारस स्थितीत आढळून आली. ही घटना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास लक्षात आली. महिलेला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
पांझरा नदीकिनारी शिवाजी रोड सिद्धेश्वर गणपती मंदिर आहे. मंदिराजवळ नदीकिनारी एक अनोळखी महिला बेवारसस्थितीत आढळून आली. तिचे वय अंदाजे ५०. घटना लक्षात येताच नागरिकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. प्रकार दुपारी १ वाजेच्या सुमारास लक्षात आला. घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक डी. बी. उजे हेड कॉन्स्टेबल मुक्तारमन्सुरी, नीलेश पोतदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिला बेशुद्धावस्थेत पडलेली होती. रुग्णवाहिकेने तिला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तिचा मृत्यू हा नैसर्गिक आहे की घातपात, याचा तपास शहर पोलीस करीत आहेत.