प्रा.डॉ. छाया व्ही. ठिंगळे यांना नॅशनल ग्लोबल टीचर अवॉर्ड सन्मानित
मुक्ताईनगर (सचिन झनके) येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर, मानसशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. छाया व्ही. ठिंगळे यांना आविष्कार फाउंडेशन सोलापूर यांच्याकडून नॅशनल ग्लोबल टीचर अवार्ड 2022 ने सन्मानित करण्यात आले.
डॉ. ठिंगळे ह्या गेल्या 22 वर्षापासून अध्यापन कार्य सोबत सामाजिक कार्यातही निरंतर अग्रेसर आहेत. त्यांनी विविध क्षेत्रामध्ये संशोधन, व्याख्याने, विविध राज्य, राष्ट्रीय व इंटरनॅशनल परिषदेमध्ये संशोधन पेपरांची वाचन केले आहे.
या त्यांच्या समानार्थ मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष अँड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, सचिव डॉ. सी.एस. चौधरी, उपाध्यक्ष नारायण चौधरी, संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एच.ए.महाजन उपप्राचार्य डॉ. ए. पी. पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले व भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.