म्हसावद आवूट पोस्ट पोलिस स्थानकात प्रजासत्ताक दिन वृक्षारोपण करून साजरा
म्हसावद ता, जळगाव (प्रतिनिधी) येथील दि.२६ जानेवारी रोजी म्हसावद आवूट पोस्ट पोलिस स्थानकात प्रजासत्ताक दिन वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलिस अधिक्षक कुमार चिंता, सोबत प्रोबेशनरी आयपीएस तसेच एम.आय.डी.सी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, म्हसावद दुरक्षेत्र इन्चार्ज स.पो.नि अमोल मोरे,स.पो.नि प्रमोद कटोरे, पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, तसेच म्हसावद येथील सरपंच. उपसरपंच. ग्रामपंचायत सदस्य गावतील ग्रामस्थ व थेपडे विद्यालयातील मुख्याध्यापक उप- मुख्याध्यापक सह शिक्षण उपस्थित होते. हे काॅ पो राजेंद्र उगले पो. हे.का रतिलाल पवार, स्वप्नील पाटील, राजेंद्र कांडेकर, दीपक चौधरी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटीलसह म्हसावद गावातील पद अधिकारी उपस्थित होते.