जि. प. प्राथ. शाळा, वरगव्हाण येथे प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा
वरगव्हाण (प्रतिनिधी) कोविड १९ च्या शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत वरगव्हाण गावात भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. ग्रुप ग्रामपंचायत वरगव्हाण येथे ग्रामपंचायत सदस्य जहांगीर तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर जि. प.प्रा.शाळा, वरगव्हाण येथे CISF जवान शरीफ तडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या वेळी शाळेची कमानीसाठी सरपंच भुषण पाटील यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचा सत्कार शा. व्या. समिती अध्यक्षा हाफिजा निसार तडवी यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच शाळेसाठी पाण्याची टाकी देणारे दाते विकास हिरामण पाटील यांचा देखील सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला. कोविड योध्दा म्हणून अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, ग्रामपंचायती चे कर्मचारी यांचा सत्कार सरपंच भुषण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. शाळा विकासास हातभार लावणारे लतीब तडवी, मुजात तडवी, धर्मा पावरा, भगवान अढाळके, संदीप पाटील यांचा देखील सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमास गावाचे सरपंच भुषण पाटील, गावाचे पोलिस पाटील गोरख नाना पाटील, नेमीचंद आप्पा सोनार, जयसिंग तात्या पाटील, ग्रामपंचायत सदस्य रविंद्र पाटील, जहांगीर तडवी, जावेद तडवी, प्रताप बारेला, इंद्रायणी पाटील, सायराबाई पावरा, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा हाफिजा तडवी व सर्व सदस्य, ग्रामसेवक विजय सोनार, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील, हैदर तडवी, दिनेश सोनार, गजानन पाटील, मस्जिद तडवी व शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला पाटील, आशा सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरीफ तडवी यांनी केले व आभार राकेश पाटील यांनी मानले.