चोपडा येथे अरुणभाई गुजराथी यांच्या उपस्थित प्रजासत्तादिन निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) येथे प्रजासत्ता दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अरुणभाई गुजराथी माजी विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत प्रजासत्तादिन निमित्त ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाची रूपरेषा सर्वप्रथम प्रार्थना नंतर ध्वज फडकवण्यात आला.
आधी राष्ट्रगीत झाले त्यानंतर अरुणभाई गुजराथी यांनी आपले प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत असताना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी पंचवार्षिक नगरपंचायत नगरपालिका जिल्हा परिषद कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक संदर्भात मार्गदर्शन केले. संपूर्ण चोपडा तालुका शहर हे राष्ट्रवादीने कसं होईल याकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून योग्य ते मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व फ्रंटलचे अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका तसेच शहरचे सर्व कार्यकर्ता, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व बंधू व भगिनीं उपस्थित होते.