जळगाव जिल्हा
गोंडगाव येथे शिवजयंती निमित्ताने डीजिटल फलकाचे अनावरण
भडगाव (सतीश पाटील) तिथीप्रमाणे शिवजयंतीचे आयोजन गोंडगाव येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केल्या असून यावेळी राम मंदिर चौकात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे डीजिटल फलकाचे अनावरण करण्यात आले.
यावेळी भडगाव येथील नगरसेवक लखिचद पाटील, राजू लालचंद पाटील, उपजिल्ह युवा संघटक राहुल नेहरू पाटील, फारूख टेलर, वंदे मातरम उर्फ विजय साळुंखे आदि शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. कुठल्याही पक्षात बसा पण शिवजयंती एकत्र दिसा या उक्तीप्रमाणे गावातील सर्व नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात शिवजयंतीला हजेरी लावून रंगतदार कार्यक्रम घडविला. 19 फेब्रुवारीला शिवजयंती शासनाची परवानगी न मिळाल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला होता. मात्र त्याची भर या शिवजयंतीच्या कार्यक्रमात निघून आल्याचे दिसून आले.


