नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी सोडवण्यासाठी पोलीस विभागाकडून तक्रार निवारण दिनाचे आयोजन
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) डॉक्टर प्रवीण मुंढे, जिल्हा पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या सूचनेनुसार आज दिनांक २ जुलै २०२२ रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० वाजेदरम्यान तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे.
भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन,त्याचप्रमाणे भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील ज्या नागरिकांनी पोलीस स्टेशन कडे काही तक्रार अर्ज केलेले असतील त्यांनी तसेच नागरिकांच्या कोणत्याही दखलपात्र वा दखलपत्र स्वरूपाच्या तक्रारी असतील तर सदर नागरिकांनी आज सकाळी दहा ते दोन या दरम्यान भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर राहावे.
आज यादरम्यान सर्व संबंधित तपासी अंमलदार त्याचप्रमाणे सर्व पोलीस अधिकारी सदर तक्रार निवारण दिनास हजर राहणार आहे. तरी ज्या ही नागरिकांच्या पोलीस पोलीस विभागाकडे यापूर्वी काही तक्रारी प्रलंबित असतील त्यांनी त्याचप्रमाणे ज्यांच्या पोलीस विभागाची निगडित तक्रारी असतील. त्यांनी उद्याच्या तक्रार निवारण दिवशी समक्ष व प्रतिनिधी मार्फत हजर रहावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी केले आहे.