वरणगाव शहारामध्ये 10/12 दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हे पाप भाजपचेच नाहक माविआला बदनाम करू नये ; आशपाक काझी
वरणगाव : शहरात या उन्हाळ्यात 10-12 दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे यास सर्वश्री जबाबदार भाजप आहे, वरणगाव ग्रामपंचायत असतांना वरणगाव वासीयांना पाणीपुरवठा व्हावा यासाठी साडे तेरा कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्याकाळात ग्रामपंचायत वर भाजप ची सत्ता होती हे सर्व शहर वासीयांना माहिती आहे. नंतर नागरपरिषदे मध्ये सुद्धा भाजपचीच सत्ता होती तरीही साडे तेरा कोटींची योजना असफल झाली आणि आता तेच लोक वरणगाव वासीयांना पाणी मिळावे म्हणून विविध प्रकारची नौटंकी आंदोलने करून महाविकास अडघाडी सरकारचा कुठलाही संबंध नसतांना सरकारला बदनाम करू पाहत आहे, असं आशपाक काझी म्हणाले.
या योजनेची सखोल चौकशी करावी यासाठी आम्ही सनदशीर मार्गाने मुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, पाणीपुरवठा मंत्री, जिल्हाधिकारी, प्रताधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदन दिले. सदरच्या साडे आठ कोटींची योजना साडे तेरा कोटींमध्ये खर्च करूनही शहरसाठी कुचकामी ठरली आहे. सदर योजनेचे काम करत असताना मुख्य जलवाहिन्या ह्या नाकाशाप्रमाणे न टाकता ठिकठिकाणी वळवण्यात आल्या आहे व काही जलवाहिन्या ह्या नवीन पाईप न टाकता जुन्याच जोडून दिलेल्या आहे. सदरचे काम हे इस्टिमेट, वर्कऑर्डर व निवदे प्रमाणे झालेले नाही. जलवाहिन्या चे असलेले पाईप हे जुनेच असल्याने त्या फुटतात व रस्ते सिमेंट काँक्रीचे व डांबराचे झाल्याने ते लिकेज झालेले पाणी वर येत नाही व ते समजत नाही. त्यामुळे पाणी लिकेज मुळे योग्य त्या दाबाने पाणी पुरवठा होत नाही. अत्यंत जीर्ण झालेल्या व अतिशय जुन्या पाईपलाईन चा वापर करून नवीन पाईप टाकणे टाळले आहे. त्यामुळे पाणीपुरवठयाची समस्या निर्माण झाली आहे.
राहिला प्रश्न पंचवीस कोटींच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचा सदर योजनेला आमच्याच महाविकास आघाडी सरकारने 25 कोटी रु दिलेले आहे. त्याचे काम लवकर व्हावे हे आमची ईच्छा आहेच त्याबाबत आम्ही देखील मुख्याधिकारी व प्रशासक यांच्याकडे मागणी केलेली आहे. परंतु सध्या जो उशिराने पाणीपुरवठा होत आहे. त्याचा आणि नवीन पाणीपुरवठा योजनेचा कुठेही अर्थो अर्थी कुठेही संबंध जुळत नाही आपण वरणगावकरच्या तोंडाचे पळवलेले पाणी व साडे तेरा कोटींच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये केलेले पाप झाकण्यासाठी आपण नवीन पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत जनतेची दिशाभूल करत आहात. त्याच साडे तेरा कोटींच्या योजनेत उत्तम प्रकारचे पाईप, व्हाल वापरले असते व इस्टिमेट प्रमाणे सर्व नवीन पाईपलाईन टाकली असती तर आज जनतेवर ही वेळ आली नसती. महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी याआधी देखील नगरपरिषद मध्ये 2 वेळा बैठक लावून पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी चर्चा करून पूर्ण पदावर आणण्यासाठी प्रयत्न होत आहे. परंतु, जुन्या व जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजनेमुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही आहे तरी सुद्धा कर्मचारी रात्रंदिवस मेहनत करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे असे निदर्शनास आले आहे. तरी या वरणगावकर मायबाप जनतेचि दिशाभूल करणाऱ्या व महाविकास आघाडी सरकारला बदनाम करणाऱ्या वरणगाव चमकोगिरी भाजपचा जाहीर निषेध.
“चोराच्या उलट्या बोंबा” आपण केलेल्या साडे तेरा कोटींच्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी मोर्चे, आंदोलने करून भागणार नाही त्याची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून नगरपरिषदे मार्फत त्याची चौकशी होणार आहे. तेव्हा दुध का दूध पाणी का पाणी होणारच आहे तेव्हा खरा भ्रष्टाचार कोणी केला हे समोर येईलच. महाविकास आघाडीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकावर काँग्रेसचे वरणगाव शहर अध्यक्ष अशपाक काझी, शिवसेना शहर प्रमुख निलेश ठाकूर व संतोष माळी व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष दीपक मराठे यांच्या स्वाक्षरी आहे.