देगलूर महाविद्यालय येथे सूर्यनमस्कार समारोह संपन्न
देगलूर (प्रतिनिधी) देगलूर महाविद्यालय, देगलूर येथे राष्ट्रीय छात्र सेना विभागच्या विद्यार्थांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ७५० मिलियन सूर्यनमस्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार व एन सी सी चे विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. निरजकुमार उपलंचवार व या कार्यक्रम करीत ५२ महाराष्ट्र बटालियन चे कर्नल वेत्रिवेलू यांचे मार्गदर्शन लाभले तर सुभेदार तारसेम सिंग व हवलदार संदीप यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार यांनी विध्यार्थ्यांना सूर्यनमस्कार चे महत्त्व विशद केले. मानवाच्या आरोग्यसाठी मन, बुद्धी व शरीर स्वास्थसाठी विद्यार्थांनी दररोज किमान १० सूर्यनमस्कार योग्य पद्धतीने करावेत त्यामुळे आपले जीवन निरोगी राहील असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाकरीता एन सी सी चे सिनिअर प्रसाद कोंकेवार, नुक्कुलवार सुरेश व अक्यमवार साईराम यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. हे कार्यक्रम यशस्वी पणे झाल्या मूळे अड्त व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर, संस्थेचे सचिव शशिकांत चिद्रावार, उपाध्यक्ष नारायणराव मैलागीरे, सहसचिव सुर्यकांत नारलावार, कोषाध्यक्ष विलास तोटावार व कार्यकारिणी मंडळ सदस्य राजकुमार महाजन, डॉ. कर्मवीर उंग्रतवार, देवेंन्द्र मोतेवार, गंगाधर जोशी, जनार्दन चिद्रावार, रवींद्र अप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार, प्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार, उपप्राचार्य निवृती गोविंदवार, प्रसिद्धि प्रमुख डॉ. बी. आर. कत्तुरवार, पर्यवेक्षक प्रा. संग्राम पाटील, कार्यालय अधीक्षक गोविंद जोशी यांनी आभिनंदन केले आहे.



