महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखेतर्फे गटशिक्षणाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन !

सोयगाव (विवेक महाजन) महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सोयगावच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सोयगाव यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले.

विविध मागण्या खालीलप्रमाणे

अर्जित रजेवर जाणाऱ्या शिक्षकांचे वेतन कपात न करणे.
शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात दर महा शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणे व समस्यांचे निराकरण करणे.
शिक्षकांचे सर्विस बुक मधील नोंदी पूर्ण करणे.
वरिष्ठ वेतन श्रेणी भाषा सूट परीक्षा परवानगी यासह इतर याद्या शिक्षक सेनेस देणे.
प्रलंबित सर्व वेतन देयके प्राप्त तारखेपासून क्रमवार पद्धतीने देण्यात यावेत.
थकित वेतन देयकाची रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी.
तहसील कार्यालयामध्ये निवडणूक किंवा इतर कारणांसाठी नियुक्त्या देताना ५३ वर्षे वय पूर्ण असलेले शिक्षक, अपंग शिक्षक ,दुर्धर आजाराने ग्रस्त शिक्षक यांना वगळण्यात यावे.
कोरोनामुळे मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव त्वरित पाठवणे व त्यांच्या कुटुंबाला सहकार्य करणे.
या मागण्या संदर्भात गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सोयगाव यांनी सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे