चोपडा

पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात ‘अल्पसंख्यांक हक्क दिवस’ उत्साहात साजरा

चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग आयोजित “अल्पसंख्यांक हक्क दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.महादेव वाघमोडे उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संजय पाटील उपस्थित होते.

याप्रसंगी अल्पसंख्यांक हक्क दिवसा प्रसंगी विचार मांडताना अल्पसंख्यांक दिवस हा संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकृत व प्रस्तुत करण्यात आला. अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म व परंपराचे संवर्धन व अभिव्यक्तीचे स्वतंत्र मिळावे. व त्यांना घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव व माहिती मिळावी या उद्देशाने संपूर्ण जगामध्ये अल्पसंख्यांक दिवस साजरा करण्यात येतो. दुसऱ्या महायुद्धामध्ये अल्पसंख्यांक समुदायावर वांशिक व धार्मिक द्वेषा पोटी प्रचंड नरसंहार झालेला होता. अल्पसंख्यांक समुदायावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार थांबावा व त्यांना स्वतंत्रता, समता, बंधुता व न्याय या मुल्या प्रमाणे मुक्तपणे जगता यावे व त्यांना त्याचे हक्क व समान संधी मिळावी. असे मत प्रा .डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.

त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात प्रा. डॉ. वाघमोडे यांनी आजच्या अल्पसंख्यांक दिवसाचे महत्व सांगितले. आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शामसिंग वळवी यांनी केले तर आभार प्रा. डॉ. किशोर पाठक यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे