जळगाव जिल्हा
नंदुरबार जिल्ह्यासाठी स्थानिक सुट्टया जाहीर
नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सन २०२२ या वर्षाकरीता तीन दिवस स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.
होळी गुरुवार १७ मार्च, अनंत चतुर्दशी शुक्रवार ९ सप्टेंबर तसेच दिवाळीचा दुसरा दिवस मंगळवार २५ ऑक्टोबर असे तीन दिवस जिल्ह्यातील शासकीय कार्यालयासाठी (न्यायालयीन विभाग वगळून) सुट्टी असणार आहे.