सर्वसाधारण सभेला ९ महिन्यांनी सापडला मुहूर्त
मुक्ताईनगर (सचिन झनके) (शैलेश गुरचळ) मुक्ताईनगर नगरपंचायच्या नगराध्यक्ष यांना अपात्र ठरल्यानंतर मुक्ताईनगर नगरपंचायत ची सर्वसाधारण सभा आतापर्यंत पार पडलेली नव्हती. तब्बल नऊ महिन्यांनी नगरपंचायतला सर्वसाधारण सभा घेण्याचा मुहूर्त सापडला असून आज प्रभारी नगराध्यक्ष मनीषा प्रवीण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. या सर्वसाधारण सभा नऊ महिन्यांने आधी झालेली होती.
यादरम्यान नगराध्यक्ष नजमा तडवी यांचे पद जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रद्द रद्द बाद ठरवण्यात आलेले होते. व नगराध्यक्ष पदाचा प्रभार अध्यक्ष मनीषा पाटील यांच्याकडे देण्यात आलेला होता. गेल्या पाच महिन्यापासून प्रभारी नगराध्यक्ष असताना जवळपास तीन ते पाच विषय सभा झाल्याअसल्या तरी सर्वसाधारण सभा मात्र अद्यापही झालेली नव्हती. मुक्ताईनगर शहरातील विविध विकास कामाच्या संदर्भात व लोकपयोगी कामाच्या विषयांना सुजल्यावर घेऊन सर्वसाधारण सभा व्हावी अशी अपेक्षा नगरसेवकांची व्यक्त केली होती. त्यानुसार आज ही सोमवारी सर्वसाधारण सभा पार पडली. यातील बहुतांश ए विषयांवर खडसे समर्थक भाजपाचे सत्ताधारी नगरसेवक आ. चंद्रकांत पाटील यांचे समर्थक नगरसेवक यांच्यामध्ये एकमत न झाल्याने बहुतांशी विषयी आज हे थांबवण्यात येऊन लवकरच नवीन सर्वसाधारण सभा घेऊन शिवसेनेच्या 50 कोटीच्या विकासाचा कामासह सहभाग घेण्यात यावी, अशी मागणी सेनेच्या नगरसेवकांनी लावून धरल्याने पुढील सर्वसाधारण सभा लवकरच घेण्यात येईल प्रशासनामार्फत कळवण्यात आलेले आहे.