तालुक्यात १७ मे पासून ड्रोन द्वारे गावठाण जागांचे होणार सर्व्हेक्षण ; डिजिटाईज्ड नकाशे उपलब्ध होणार !
अमळनेर : महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात दि. 17 पासून सुरू करण्यात येणार असून 133 गावांची ही तपासणी करण्यात येणार आहे.
गुरुवारी येथील जी एस हायस्कूल मधील लायन्स क्लबच्या हॉलमध्ये महसूल, भूमी अभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून गावठाण जमाबंदी प्रकल्पांतर्गत ड्रोनद्वारे तालुक्यातील गावठाणांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात अमळनेर तालुक्याची निवड करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी सीमा हिरे व तहसीलदार मिलिंद वाघ उपाधिक्षक भूमी अभिलेख बी सी अहिरे, आशिष गिरी, कमलेश जोशी व कर्मचारी वृद उपअधीक्षक भूमी अभिलेख बी सी अहिरे, आशिष गिरी, कमलेश जोशी व कर्मचारी वर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व ग्रामसेवक व तलाठी गावाचे सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत ड्रोन सर्वे ची माहिती गावाच्या सीमा गावाचे रस्ते व सीमा चुना टाकून सर्व्हेक्शन करण्यात येणार आहे.
ड्रोनद्वारे होणाऱ्या या मोजणीमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार असून, जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकीहक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहेत. राज्यातील बहुतांश गावठाणांचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अनेकदा अडचणी येतात; तसेच वादही होत असतात. आता ड्रोनच्या माध्यमातून मालमत्तांची मोजणी केली जाणार असल्याने मालमत्तेवरून होणारे वाद मिटणार आहेत. त्यामुळे या गावांतील नागरिकांना मालमत्तांच्या मालकी हक्कांचे प्रमाणपत्र मिळणार आहे. या गावांतील ग्रामपंचायतींचे नकाशे, सरकारी जमिनी आणि सरकारी जमिनींवर झालेली अतिक्रमणे याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.
गावठाण मोजणीसाठी जिल्हानिहाय प्रत्येकी एक ड्रोनची व्यवस्था
– सर्व्हे नंबरच्या अभिलेखांद्वारे गावठाणांच्या सीमा निश्चित करून लावण्यात येणार पिलर
– ड्रोनद्वारे मोजणी करण्यापूर्वी गावठाणांचे ड्रोन छायाचित्र काढण्यात येणार
– ड्रोन छायाचित्रांबरोबर डिजिटल नकाशा तयार केला जाणार
– नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविल्यानंतर गावठाणांचे नकाशे होणार
जिल्ह्यातील गावठाणांतील जमीन सर्वेक्षणासाठी संबंधित सरकारी यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मिळकतींचे सर्वेक्षण करून डिजिटाइज्ड नकाशे तयार केले जाणार आहेत. ड्रोनद्वारे गावठाण मोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.