शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त “नमा शर्मा” यांचे तीन दिवसीय कार्यक्रम संपन्न
भुसावळ (अखिलेशकुमार धिमान) शिवसेनेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त भुुुसावळ शहरात शिवभोजन संचालक “नमा शर्मा” यांचे तीन दिवसीय कार्यकम संपन्न झाले. त्यात १) वृक्षरोपण,२)अन्नदान, व ३)भुसावळ येथे भगीरथ प्राथमिक शाळा येथील १०० मुला-मुलींना गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप तसेच खाऊवाटप करण्यात आले.
या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन तालुका संघटक धीरज पाटील शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, माजी नगरसेवक मुकेश गुंजाळ,रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललित कुमार मुथा, विभाग प्रमुख अरुण साळुंखे,युवा सेनेचे माजी शहर प्रमुख मिलिंद कापडे, ज्येष्ठ शिवसैनिक हेमंत खंबायत,पवन मेहरा व पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्राचे संचालक उमाकांत शर्मा ( नमा शर्मा )यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आला शहर शिवसेनेतर्फे समाजपयोगी कार्यक्रम राबवण्याचा उपक्रम हा कौतुकास्पद आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना मदत व्हावी या उद्देशाने शिवसैनिक नेहमीच प्रयत्नशील असतो यापुढेही असे समाजपयोगी उपक्रम शहर व तालुका शिवसेनेच्या मार्फत राबवणार आहोत.असे जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांनी सांगितले पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या २७ जुलै ला येणाऱ्या वाढदिवसानिमित्त भगीरथी हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर तसेच शालेय गणवेश वाटप करणार आहोत.असे “नमा शर्मा” यांनी जाहीर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगीरथी हायस्कूलच्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.