उपविभागीय अधिकऱ्यांच्या वतीने मुस्लिम बांधवांना सन्मानपत्र देऊन गौरव
अमळनेर (प्रतिनिधी) येथील मुस्लिम बांधवांनी आवास संस्थेच्या माध्यमातून कोरोना पॉझिटीव्ह मयत झालेल्या व्यक्तींना विविध धर्मांच्या रितीरिवाज प्रमाणे तालुक्यातील एकुण ११८ व्यक्तींच्या मोफत अंत्यविधी केले.
अमळनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून सदरील विषयास दोन वेळा निविदा प्रक्रिया करून ही कुणी पुढे आले नाही. आवास बहुउद्देशीय संस्थाने मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांना लेखी पत्राद्वारे मोफत अंत्यविधी करू फक्त पीपी किट नगरपरिषदने पुरावे, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. कोरोनाकाळात अतिशय चांगल्याप्रकारे संस्थेच्या वतीने काम केल्याबद्दल २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील पोलिस लाईन मैदानावर महसूल विभाग उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने आवास फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक बशीरोद्दीन शेख, गुलाम नबी पठाण, नविद शेख, सैय्यद अहेमद अली, जाविद खाँ पठाण, मजहर शेख, जमालोदीन शेख, अमजदअली शाह, इंजि इम्रान कुरैशी, असलम खान पठाण, यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आमदार भूमिपुत्र अनिल भाईदास पाटील, प्रांत अधिकारी सिमा आहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलिस निरीक्षक, जयपाल हिरे, जिल्हा परिषद सदस्य जयश्री पाटील यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन संजय पाटील यांनी केले.