अमळनेर येथे भव्य टेनिस बॉल टूर्नामेंट, क्रिकेट स्पर्धा संपन्न
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण व शहरी भागात अनेक हुन्नरी क्रिकेट खेळाडू आहेत. ज्यांना संधी मिळत नाही, अशा खेळाडूंना वाव मिळावा व चमकण्याची संधी मिळावी या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या वर्षाच्या सुरुवातीलाच बी एफ स्टार ग्रुप व बालविर व्यायाम शाळा, बंगाली फाईल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य टेनिस बॉल टूर्नामेंट, क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रुपये 11000/- हे सामाजिक कार्यकर्ते भरत पवार तर द्वितीय पारितोषिक रुपये 5000/-हे धनंजय साळुंखे मनसे शहर अध्यक्ष यांचेकडून देण्यात आले. त्याचबरोबर रवींद्र पाटील व लखन शिंदे यांचे कडून मॅन ऑफ द मॅच व मॅन ऑफ द सिरीज साठी रुपये 1100/- देण्यात आले. या स्पर्धेसाठी सौरभ स्टुडिओ, अंकिता कॉस्मेटिक, कृष्णा आईस्क्रीम, वेद, ऑडिओ साई पोहा व बाबा ग्रुप यांचे देखील सहकार्य लाभले. प्रथम पारितोषिक हे पाचपावली मित्रमंडळ यांनी पटकावले असून द्वितीय पारितोषिक हे उपविजेती टीम बी एफ स्टार क्रिकेट क्लब ठरली आहे आहे.
पारितोषिक वितरणाच्या वेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू महाले यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आरोग्य ही सर्वात मोठी संपदा आहे. तिला सांभाळून ठेवण्यासाठी प्रत्येकाने खेळले पाहिजे. अशा या स्पर्धेचे आयोजन करून तरुण खेळाडूंना वाव देण्याचे काम आयोजक करतात ही मोठी प्रशसनसीय बाब आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवलेल्या संघाला शुभेच्छा देत भविष्यात अमलनेरातून राष्ट्रीय पातळीवर खेळणारे खेळाडू निर्माण होवोत अशी आशा व्यक्त केली. यावेळी अमळनेर नप चे माजी बांधकाम सभापती मनोज पाटील, माजी नगरसेवक साहेबराव शेजवळ क्रीडा शिक्षक सुनील वाघ व सर्व क्रिकेट प्रेमी व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.