डॉ.सुरेशजी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग चोपडा राष्ट्रीय बालिका दिन साजरा
चोपडा (विश्वास वाडे) कोरोना काळातील सर्व नियमांच्या आधीन राहून महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, दादासाहेब डॉ. सुरेश जी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग, चोपडा येथे “राष्ट्रीय बालिका दिन” साजरा करण्यात आला. सदर दिवशी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी रांगोळीद्वारे बालिकांचे महत्व दाखविले. तसेच “बेटी बचाओ बेटी पढाओ” यावर पथनाट्य सादर केले.
कार्यक्रमास नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी निलेश ठाकूर, नर्सिंगचे समन्वयक विलास दारुंटे तसेच जनशिक्षण संस्थेचे संचालक रवींद्र कुडाळकर व नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या करुणा चंदनशिव आणि शिक्षक कर्मचारी तेजस पावरा, निकिता लोखंडे, मो.तबरेज व इतर कर्मचारी राहुल पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नर्सिंग महाविद्यालयाच्या शिक्षिका नेहा चंदनशिव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अॕड.संदीप सुरेश पाटील, तसेच संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.