सोयगाव नगरपंचायत निवडणूक : पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या उमेदवारांनी भरले उमेदवारी अर्ज
सोयगाव (प्रतिनिधी) सोयगाव नगरपंचायतीच्या होवू घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आले. या निवडणुकीसाठी शिवसेनेने १७ पैकी १७ जागेंसाठी उमेदवारी अर्ज भरले आहेत.
गेल्या दोन तीन दिवसांपासून शिवसेनेच्या वतीने उमेदवारांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होती. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने तहसील कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात आले. यावेळी युवानेते तथा सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अ.सत्तार , शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख प्रभाकर (आबा) काळे, तालुका संघटक दिलीप मचे, सिल्लोडचे नगरसेवक राजू गौर आदी, गुलाबराव कोलते शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवसेनेकडून भरण्यात आलेल्या अर्जामध्ये तालुकाप्रमुख प्रभाकर काळे, सुरेखा प्रभाकर काळे, शहरप्रमुख संतोष बोडखे, माजी शहरप्रमुख गजानन चौधरी, रमेश गव्हांडे, अक्षय काळे, राजू दुतोंडे, संदीप चौधरी, लतीफ शहा, संध्याताई मापारी, मंगेश सोहणी आदींचा समावेश आहे.



