आदर्शमाता प्रतिष्ठान च्यावतीने बाबासाहेबांना अभिवादन
कराड-पाडळी (प्रतिनिधी) तालुका कराड येथील आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्या वतीने कराड येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिमेचे पूजन भीम आर्मी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जावेद भाई नायकवडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, भीम आर्मी सविधान रक्षक दल सामाजिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, जान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जावेदभाई नायकवडी, भीम आर्मी सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष संतोष थोरवडे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे सातारा जिल्हा अध्यक्ष आबासाहेब वाघमारे, भीम आर्मी सविधान रक्षक दल सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष भागवत कांबळे, भीम आर्मी जिल्हा नेते अशोकराव मस्के, मदनी चारीटेबल ट्रस्ट चे कराड तालुका अध्यक्ष, राष्ट्रीय काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे कराड दक्षिण तालुका उपाध्यक्ष उमरफारूक सय्यद, भीम आर्मी कराड तालुका उत्तर अध्यक्ष अनिकेत साळुंखे, दलित महासंघाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष सुरज घोलप, भीम आर्मी कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष रघुनाथ माने, जब्बार मुजावर उपस्थित होते.