अन्यायग्रस्त शेतक-याचं विविध आदिवासी संघटनांना निवेदन
धुळे (प्रतिनिधी) काकर्दे (काकरपाडा) ता. साक्री जि. धुळे शिवारातील अन्यायग्रस्त शेतकऱ्याने आदिवासी बचाव अभियान साक्री (धुळे), जयस संघटन साक्री, बेधडक रोखठोक आदिवासी संघ, या संघटनांना निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, इंडियन आॅईल काॅर्पोरेशन लिमिटेड पेट्रोलियम पाईपलाईनचे काम चालू आहे. कंपनीच्या लोकांनी गरीब आदिवासी काकर्दे शिवारातील शेतकरी ग. नं. १७०/२ असून सदर कंपनीचे अधिकारी जमिनीचा व फळझाडांचा योग्य मोबदला न देता, सदर काम चालू करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे. तरी सदर पाइपलाईनमध्ये होणाऱ्या नुकसानीचे मोबादला हा तोंडी सांगण्यात येत आहे व कमी प्रमाणात सांगण्यात येत आहे. तरी मोबदला मला मान्य नाही. जो पर्यंत फळझाडांचा व जमिनीचा योग्य तो मोबदला मिळत नाही. तो पर्यंत आम्ही तेथे कोणत्याही प्रकारचे मशिन चालू न देण्याचे ठरवले आहे. संबंधित पाइपलाईनचे अधिकारी बळजबरीने काम सुरू करण्याचे चिन्ह दिसत आहे. तरी सदर पाईपलाईनमध्ये आमच्या फळझाडांचे व शेतजमीनीचे मोठे नुकसान होणार आहे. तरी आदिवासी समाजातील विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी यांनी आदिवासी समाजातील शेतक-याला न्याय मिळवून द्या, असे यात म्हंटले आहे.