महाराष्ट्रराजकीय
शिंदखेडा येथे बिजासनी पेट्रोल पंपाचा आ. जयकुमार रावल यांच्या हस्ते आज शुभारंभ
शिंदखेडा (यादवराव सावंत) येथील टेमलाय फाटा होळ रोडवरील बिजासनी पेट्रोल पंपाचा आज चार वाजता माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार असून यावेळी सत्यनारायण महापुजा व तिर्थ प्रसादाचे आयोजन केले आहे.

सदर कार्यक्रमास शहरातील व परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगरपंचायत नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे, गटनेते अनिल वानखेडे, माजी ग्रा.पं.सदस्य दयाराम माळी, काँट्रॅक्टदार विजय अनिल वानखेडे, राजाराम देवराम माळी, भाजपचे शहराध्यक्ष प्रविण राजाराम माळी, चि.लतिक प्रविण माळी, यांनी केले आहे. या पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल दर्जेदार मिळेल अशी ग्वाही दिली आहे. तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




