प्रहार संघटना जळगाव जिल्हा सल्लागारपदी प्रविण पाटील यांची नियुक्ती
जळगाव (प्रविण पाटील) राज्यमंत्री ओम प्रकाश कडू यांची प्रहार संघटना ही महाराष्ट्रात तसेच इतर राज्यांमध्ये सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी व न्यायासाठी समाज माध्यमांमध्ये प्रचलित आहे.
तसेच अंध अपंग व गोरं गरीबांची सेवा हीच ईश्वर सेवा हेच संघटनेच ब्रीद वाक्य आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओडखावा देव तेथीची जाणावा ही संकलपनां मनी धरून प्रहार संघटनेचे कार्य हे पुर्ण महाराष्ट्र ओळखून आहे. यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी प्रहार संघटना जिल्हा सल्लागारपदी प्रवीण पाटील यांची नियुक्ती केली.
ह्यावेळी कर्तव्य दक्ष टाइम्स चे पत्रकार व करनी सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष निलेशसिंह राजपूत, दीपक पाटील जिल्हा सल्लागार, किशोर पाटील चाळीसगांव तालुका उपाध्यक्ष राजेश खडके सचिव, ज्येष्ठ पत्रकार प्रताप सिंग परदेशी भिका दादा, चाळीसगाव प्रहार संघटना महिला आघडीचे स्वाती कुमावत, आरोग्य सेवक हरिष कुमावत, संजय कौतिक इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ह्या निवडी संदर्भात प्रवीण पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब पाटील व संघटनेच्या पदाधिकारी यांचे आभार मानले.