चोपडा
चोपडा येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या शासनाचा निषेधार्थ अर्धनग्न आंदोलन
चोपडा (जळगांव) : विश्वास वाडे , तालुका विशेष प्रतिनिधी
चोपडा : एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे हे प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे संप सुरू आहे या संपामध्ये चोपडा डेपोचे कर्मचारीही सहभागी झाले आहेत संपाचे आज सहावा दिवस आल्यावर देखील राज्य शासनाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही तसे चोपडा आगारातील आठ कर्मचाऱ्यांना निलंबनाची नोटीस देण्यात आली आहे शासन-प्रशासन कर्मचाऱ्यांवर वेगवेगळे दबावतंत्र आजमावत असताना आज चोपडा आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन करून शासनाविरुद्ध घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरू राहील व यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे संपकरी कर्मचाऱ्यांनी सांगितले.