अश्विनी गुजराथी यांची लक्ष्मी पतसंस्थेच्या चेअरपर्सनपदी निवड
चोपडा (विश्वास वाडे) येथील लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या महिलांनी चालवलेल्या पतसंस्थेच्या चेअरपर्सनपदी अश्विनी प्रसन्नलाल गुजराथी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्या इनरव्हिल डिस्ट्रिक ३०३ च्या विद्यमान डिस्ट्रिक्ट चेअरमन, चोपडा नगर परिषदेच्या विद्यमान नगरसेविका व भगिनी मंडळाच्या सहसचिव आहेत.
पतसंस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. संस्थेच्या परंपरेप्रमाणे २०२१ ते २०२६ या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. संचालक मंडळाच्या बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी डी. डी. पुरोहित यांनी केली. सन १९९० मध्ये स्थापन झालेल्या व १९७४ सभासद संख्या असलेल्या लक्ष्मी पतपेढीची चोपडा शहर व तालुक्यात महिलांनी चालवलेली पतसंस्था म्हणून वेगळी ओळख आहे.
लक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चोपडा चे संचालक मंडळ पुढीलप्रमाणे : चेअरपर्सन – अश्विनी प्रसन्न गुजराथी, व्हा. चेअरपर्सन – जागृती अशोक जैन, संचालक – सीमा मनोजकुमार अग्रवाल, रजनी राजेश सराफ, वैशाली नितीन गुजराथी, वैशाली अनिल अग्रवाल, वैशाली ईश्वर सौंदाणकर, ज्योती राजेंद्र गुजराथी, सुरेखा सुभाष देसाई, सरला जगन्नाथ माळी, सरला नरेंद्र शिरसाट, नवीन संचालक मंडळाचे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, उद्योजक आशिष गुजराथी, लक्ष्मी पतपेढीच्या माजी चेअरपर्सन उर्मिलाबेन गुजराथी, कुमुदिनीबेन गुजराथी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले. याप्रसंगी प्रसन्न गुजराथी, प्रा. डॉ. आशिष गुजराथी, व्यवस्थापक शाम गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.