गुन्हेगारी
न्यायालयाच्या बाहेर जावयाला झाली मारहाण ; सहा जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : धुळे जिल्हा न्यायालयाच्या बाहेर कौटुंबिक कारणावरून वाद झाला. या वादातून जावायाला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सहा जणांविरुध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथील कांतीलाल देवराम पवार (वय ३८) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार दादा ओंकार शिंदे, ओंकार सुका शिंदे, अनिल पांडू पवार, दीपक हीलाल पवार, किशोर बाबुलाल शिंदे, साहेबराव बाबुलाल शिंदे यांनी न्यायालयाबाहेर अडवले. आमच्या मुलीला का घेऊन जात नाही असे कारण पुढे करुन मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.