चिंचोली येथील सैन्य दलातील सैनिकाच्या सेवानिवृत्ती सोहळा
जळगाव (अल्लाउद्दिन तडवी) भारतीय सेन्य दलात प्रदीर्घ अशी २० वर्ष सेवा करून सेवानिवृत्त झालेले जवान प्रकाश पुंडलिक पोळ यांचा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पाडण्यात आला.
चिंचोली ता.जि.जळगाव येथील सैन्य दलात दाखल झालेले जवान प्रकाश पुंडलिक पोळ यांनी अत्यंत तळमळीने आपल्या देशाची देशसेवा केली ज्या रोजी त्यांची सेवानिवृत्ती झाली त्या निमित्ताने प्रारंभी रेल्वे स्टेशन वर तसेच महानगरपालिका जळगाव येथे प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पमाला देवून यथोचित सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे गावातील सर्व ग्रामपंचायत कमेटी व इतर मान्यवर प्रतिष्ठीत नागरिक, थोर-मोठे व्यक्ती तसेच सर्व मित्र परिवार यांच्या हस्ते देखील सेवानिवृत्त जवान यांचा सत्कार करून संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली यावेळी सदर जवानाच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले. याकामी मित्र परिवारातील आलेलली मित्र मंडळी मनोज शेळके ,गणेश पालवे, अनंत अरतकर, रवींद्र वाघ, विनोद कोळी, अतुल पालवे, सचिन धुगे, विजय नामदेव धुगे, विनोद इखे, समाधान हेमाडे, राजू पोळ, शरद दुमाळ, प्रवीण वाघ, गणेश युगे आणि इतर सर्व मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.