चोऱ्या, घरफोडयांना आळा घालण्यासाठी बारा गावात ग्राम सरंक्षण पथकाचे कार्य सुरु
जळगाव (नुरखान) जिल्हयातील अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वाढलेल्या चोऱ्या, जनावर चोऱ्या व घरफोडया यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी गावागावात “ग्राम संरक्षण पथक” स्थापन करण्येबाबत आदेश दिले होते. त्या अनुषगाने अमळनेर पोलीस स्टेशनला मंगरुळ, शिरुड, जानवे, कावपिंप्री, वाघोदा, डांगर, रणाईचे, चोपडाई, कोंढावळ, चिमणपुरी, पिंपळे खु., पिंपळे बु, या बारा गावात आज रोजी ग्राम सरंक्षण पथकाचे कार्य सुरु करण्यात आले. त्यासंबंधात उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे अध्यक्षतेखाली वरील बारा गावांची बैठक पोलीस स्टेशनला घेण्यात आली.
सर्वांना लाठी, शिटी व ओळखपत्र देण्यात आले आहेत. वरील प्रत्येक गावात रोज रात्री ०४ ग्राम रक्षक रात्री १२ ते सकाळी ०५:०० वाजे पर्यंत गस्त घालणार असून आजूबाजूच्या चार गावांचा मिळून एक व्हॉटसअॅप गृप तयार करुन त्याद्वारे सर्व ग्रामरक्षक एकमेकांशी संपर्क साधणार आहेत. या व्हॉटसअॅप गृपमध्ये सर्व अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील, चालक व गावातील प्रतिष्ठीत नागरीक राहणार असून जनावर चोऱ्या, ईलेक्ट्रीक मोटर चोरी, ठिबक चोरी, इतर अवजारे, मोटार सायकल चोरी इत्यादी प्रकारांना प्रतिबंद करण्यास मदत घेणार आहेन. वरील पथक स्थापन करण्यात सर्व गावांचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह जानवे जवखेडा बीटचे अधिकारी पोउपनि गंभीर शिंदे अंमलदार कैलास शिंदे, हितेश चिंचोरे, जनार्दन पाटील, भुषण पाटील, योगेश महाजन तसेच प्रभारी अधिकारी जयपाल हिरे, गोपनीय अंमलदार डॉ. शरद पाटील, दिपक माळी, रविंद्र पाटील, सिध्दार्थ सिसोदे यांनी ग्राम संरक्षण पथक स्थापन करण्यासाठी मेहनत घेतली आहे.