चोपडा : पंकज कला व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग राज्यशास्त्र विभाग व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला व संविधानाच्या प्रतिला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी डॉ संजय पाटील यांनी संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करुन सांगितली, संविधानाचे कलमं त्याची नियमावली स्पष्ट करून सांगितले. तसेच संविधानामुळे लोकशाहीचे बळकटीकरण झाले. संविधानाने सर्व क्षेत्रांमधील तळागाळातील जनतेला समानतेचा हक्क प्राप्त करून दिला. हक्काचे संरक्षण करून त्यांना समानतेची वागणूक मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे यांनी संविधानामुळे स्त्रियांना हक्क प्राप्त झाले असे मत व्यक्त केले. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन डॉ. नंदिनी वाघ यांनी केले . यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनील सुरवाडे यांनी केले, तर आभार प्रा. दिलीप गिर्हे यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
Speed News Maharashtra
ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159
Related Articles
काय ते गाव, काय त्या गावच्या तुडुंब गटारी काय ती अस्वच्छता. सरपंच ग्राम सेवक मात्र एकदम ओके मध्ये.
July 22, 2022
सूरमाज फाऊंडेशनतर्फे रमेश शिंदे यांचा सत्कार
April 26, 2022
सनपुले येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
April 14, 2022
सूरमाज फाउंडेशन यांनी ई-न्यूजलेटर केला प्रकाशित
March 26, 2022
Check Also
Close
-
सूरमाज फाउंडेशन यांनी ई-न्यूजलेटर केला प्रकाशितMarch 26, 2022