सिल्लोड येथे नॅशनल सुत गिरणी उभारणी कामाचा शुभारंभ लवकरच : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते अवनी जिनिंग प्रेसिंगचा शुभारंभ
सिल्लोड (विवेक महाजन) सिल्लोड येथे साकारण्यात येणाऱ्या नॅशनल सुत गिरणी कामाचा लवकरच शुभारंभ होणार असल्याची माहिती महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. नॅशनल सुत गिरणीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे दरवाढ मिळेल तसेच येथील जीनिंग प्रेसिंग युनिटला देखील चालना मिळेल असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.

पिंपळदरी येथील भावराव पा. लोखंडे यांच्या लिहाखेडी फाटा येथील अवनी जिनिंग प्रेसिंगचा शुभारंभ राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते रविवार (दि. १९ डिसेंबर २०२१) रोजी संपन्न झाला. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, जिल्हा उपनिबंधक देविदास पालोदकर, अशोक सूर्यवंशी, कौतिकराव जगताप, कृउबा समितीचे संचालक दामूअण्णा गव्हाणे, सुभाषराव गव्हाणे, भावराव लोखंडे, जालना येथील नगरसेवक फेरोज लाला, पालोद चे सरपंच नासेर पठाण, उपसरपंच मॅचिंद्र पालोदकर, नगरसेवक शंकरराव खांडवे, अजिनाथ लोखंडे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.



