धुळ्यात कर्नाटकातील घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध
धुळे (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटकात विटंबना करण्यात आली. याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील बारा पत्थर चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालण्यात आला व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच कर्नाटकातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.
यावेळी राजेंद्र चीतोडकर, जावेद मण्यार, असलम खाटीक ,बाबा कादरी, अमिन शेख, पिर मोहम्मद दादा शहा ,राज कोळी, संदीप पाटील, महेंद्र बागुल, ज्ञानेश्वर माळी, सरोजताई कदम, करुणाताई पाटील, निखिल मोनिया, महेंद्र शिरसाट, राजेंद्र चौधरी, सलीम भाई लंबू, राजेंद्र सोलंकी, रईस कादरी, एजाज शेख, अमीत शेख, राजू भैया, आयुष काकडे, आकाश विभुते, प्रणव भोसले, जगन टाकते, ऋतिक पोळ आदी उपस्थित होते.