उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
सामाजिक उपक्रमाने करण्यात आला वाढदिवस साजरा
सिल्लोड (विवेक महाजन) युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेना तसेच विविध सामाजिक संघटना व मित्र मंडळाच्या वतीने शहर व तालुक्यात विविध ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळा तसेच सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
शहरातील सेना भवन येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना, युवासेना पदाधिकाऱ्यांनी अब्दुल समीर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, मित्रजनांचे सहकार्य तसेच कार्यकर्ते व समर्थकांनी दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी कायम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी आयोजित अभिष्टचिंतन सोहळा प्रसंगी सत्काराला उत्तर देतांना केले. तसेच वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्याचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. विविध आजारा विषयी आयोजित करण्यात आलेल्या मोफत शिबिराचा निश्चितपणे गरजूंना लाभ मिळेल असा विश्वास देखील अब्दुल समीर यांनी व्यक्त केला.
येत्या १ जानेवारी रोजी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या शिबिरात विक्रमी रक्तदान होण्यासाठी विविध सामाजिक संघटना तसेच शिवसैनिकांनी सहभागी व्हावे, ज्यांना वैदयकीय दृष्ट्या रक्तदान करणे शक्य आहे त्यांनी रक्तदान करावे असे आवाहन याप्रसंगी अब्दुल समीर यांनी केले.
विविध ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास पाटील, पंचायत समितीचे उपसभापती काकासाहेब राकडे, नॅशनल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, शेख आमेर अब्दुल सत्तार, मारुती वराडे, दामुअण्णा गव्हाणे, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दुर्गेश जैस्वाल, सचिव विशाल जाधव, डॉ. दत्ता भवर, शेख इम्रान ( गुड्डू ) ,नगरसेवक रउफ बागवान, सुधाकर पाटील, प्रशांत क्षीरसागर, मनोज झंवर, आसिफ बागवान, शंकरराव खांडवे, विठ्ठल सपकाळ, मतीन देशमुख, जुम्मा खा पठाण,अनिस कुरेशी, रईस मुजावर, राजू गौर, सत्तार हुसेन,आरेफ पठाण, शकुंताबाई बन्सोड,जितू आरके, मोईन पठाण, अकील वसईकर ,सांडू मिर्झा, शेख मोहसीन, शेख बाबर, सुनील दुधे, संजय मुरकुटे, रवी गायकवाड, संतोष धाडगे, रवी रासने, मोहमद हनिफ, संजय शिंदे, फहिम पठाण, अमोल कुदळ, मानसिंग राजपूत, संतोष खैरनार , गौरव सहारे, आशिष कटारिया, कुणाल सहारे, अक्षय मगर, मधुकर बेंडाळे, अकिल देशमुख डॉ. निलेश मिरकर, डॉ. शरीफ पठाण, ऍड. तुषार गवळी, डॉ. भाऊसाहेब तायडे, डॉ.शेखर दौड, डॉ. संतोष शिंदे, डॉ. विशाल आकाते, डॉ. बाबासाहेब जाधव, डॉ.अक्षय खंडेलवाल, डॉ. विकास गोठवाल, पोपटराव साळवे, प्रवीण मिरकर, रवी गायकवाड, सचिन साळवे, लखन ठाकूर, शेख युनूस, रवी रासने, अमृतलाल पटेल, योगेश झंवर, डॉ. अहेसान शेख, डॉ. सय्यद राशीद, डॉ.सोनार, डॉ.डी.एस.भोसले, गिरीश शहा, सचिन पाखरे, विजय खाजेकर, सुनील लांडगे, अक्षय अग्रवाल, एजाज कोतवाल, वैभव कुलकर्णी, अमन देशमुख, राजू दायमा, कुणाल झंवर, चेतन उके आदींसह शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ. निलेश मिरकर यांच्यावतीने शहरातील सुमन हॉस्पिटल येथे सकाळी ९ वाजेपासून मोफत बॉडी चेकअप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता प्रियदर्शनी चौकात डीलक्स मेडिकल येथे नगरसेवक मनोज झंवर , किशोर अग्रवाल व युनिस शेख मित्र मंडळाच्या वतीने मोफत मधुमेह तपासणी, उपचार व लाडूतुला कार्यक्रमाचे घेण्यात आला. शहरातील सेना भवन येथे भव्य असा अभिष्टचिंतन कार्यक्रम घेण्यात आला. शिवसेना , युवासेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली. त्यासोबत डॉ. खंडेलवाल यांच्या वतीने खंडेलवाल हॉस्पिटलमध्ये मोफत मेंदू रोग, अर्धांगवायू, फिट्स, नसांचे विकार, हृदयरोग , श्वसन विकास, डायबिटीस निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन तसेच युवा व्यापारी प्रतिष्ठानच्या वतीने लाडूतुला, कार्यक्रम घेण्यात आला. आयोजित विविध शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला.