सार्वजनिक वाचनालय व विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
धुळे (प्रतिनिधी) तालुक्यातील खंडलाय खुर्द, खंडलाय बुद्रुक आणि बांबूर्ले या तीन गावांचे वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांत मिसळलेली परंतु स्वतंत्र अस्तित्व आणि ग्रामपंचायत असलेली आणि गेली अनेक वर्षे गुण्यागोविंदाने नांदणारी ही गावे राष्ट्रीय महामार्ग क्र ६ ते शिरधाने लामकानी रस्त्यावर वसलेली आहेत. अनोळखी व्यक्तीने या गावांमध्ये फेरफटका मारला तर एकच गाव समजेल इतके ही गावे एकरूप झाली आहेत. खंडलाय बु व बांबूर्ले या दोन्ही गावांना गाव दरवाजा नव्हता म्हणून माझ्या स्थानिक विकास निधीतून दोन्ही गावांना प्रत्येकी १५ लक्ष रुपयांचा निधी दिला. बांबूर्ले गावात २५:१५ अंतर्गत १० लक्ष रुपये काँक्रीटीकरण कामासाठी दिले, तसेच नवे भदाणे ते खंडलाय दरम्यान असलेल्या भटाई देवी नाल्यावर पुलासाठी गेल्या बजेटमध्ये ७२.८० लक्ष रुपये निधी मंजूर झाला. या सर्व कामांचे काल भूमिपूजन केले.
याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता किरण पाटील, नेर गटाचे जि प सदस्य आनंद पाटील, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा व नेर गावाच्या सरपंच गायत्रीताई जयस्वाल, माजी जि प सदस्य साहेबराव खैरनार, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ दरबारसिंग गिरासे, जवाहर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान गर्दे, सायने सरपंच योगेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गर्दे, चिंचवार सरपंच सोमनाथ पाटील, गोंदूर सरपंच हिरामण पाटील, या तिन्ही गावातील व पंचक्रोशीतील सरपंच, विविध पदाधिकारी उपस्थित होते.