अमळनेर
अमळनेर शेतकी संघात धान्य खरेदीचा आज शुभारंभ
नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची धान्य खरेदीची प्रतीक्षा संपली
अमळनेर (प्रतिनिधी) येथील शेतकरी सहकारी संघात तालुक्यातील धान्य खरेदीचा शुभारंभ आज जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या शुभहस्ते सकाळी १० वाजता मार्केट यार्ड मधील महामार्केट फेडरेशनच्या गोडावून येथे होणार आहे.
या शुभारंभामुळे नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. यावेळी शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पूनाजी पाटील सर्व प्रशासक मंडळ सदस्य व नेते मंडळी उपस्थित राहणार आहे.अमळनेर तालुक्यातील ६६३ शेतकरी धान्य खरेदीच्या प्रतीक्षेत होते,शेतमालास किमान आधारभूत हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने हमीदर जाहीर करुन नाफेड तसेच पणन महासंघामार्फत प्रत्येक तालुकास्तरावर केंद्र उघडून शेतमालाची खरेदी करण्यात येते. त्याप्रमाणे अमळनेर शेतकी संघातही यावर्षीच्या हमीदराने शेतमाल खरेदी केंद्र सुरु होत आहे. अशी माहिती शेतकी संघाचे मॅनेजर यांनी दिली आहे.