बोरद येथे भोंगर्या बाजाराची जय्यत तयारी सुरू ; १६ व १७ मार्च रोजी भोंगर्या बाजार भरणार !
बोरद (योगेश गोसावी) गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सण-उत्सव बंद असल्याने शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या हेतूने भोंगर्या बाजारही बंद करण्यात आला होता. आता मात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने बोरद येथे भोंगर्या बाजार भरणार आहे. दिनांक १७ मार्च रोजी होळी आहे. त्याच्या एक दिवस अगोदर भोंगर्या बाजार भरत असतो. म्हणजे १६ मार्च व १७ मार्च हे दोन दिवस भोंगर्या बाजार भरणार आहे. फाल्गुन शुद्ध चावदस वर होळी सण येतो. त्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे फाल्गुन शुद्ध तेरस ला भोंगऱ्या बाजार भरत असतो.
आदिवासींचे दर्शन घडविणारा भोंगर्या बाजार भरत असतो पारंपारिक वेषभूषा परिधान करून ढोल ,ताशा वर नाचत, गाजत हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. सातपुड्याच्या पायथ्याशी दरवर्षी भरत असतो दोन वर्षापासून भोंगर्या बाजार बंद असल्याने आदिवासी बांधवांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते यावर्षी सर्वत्र खुले वातावरण झाल्यामुळे व्यवसायिक व आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. भोंगर्या बाजार भरत असल्याने ग्रामपंचायतीने जय्यत तयारी सुरू केलेली आहे. बाजारात साफसफाई सुरू केली तर संपूर्ण गावात लाईटची व पाण्याची व्यवस्था केलेली आहे. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त चौक लावलेला आहे आरोग्याच्यादृष्टीने दवाखाना २४ तास उघडा राहणार आहे हे तालुक्यात सर्वात मोठे गाव असून गावाची लोकसंख्या १२००० पेक्षा जास्त या गावाशी ४० गावांचा संपर्क आहे परिसरात शंभर टक्के आदिवासी बांधवांचे वास्तव्य आहे तालुक्यात फक्त बोरद येथेच भोंगर्या बाजार हा भरत असतो. आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे आदिवासी बंधूचा मुख्य सण म्हणजे होळी होय या उत्सवासाठी दोन दिवस अगोदर सासरी गेलेल्या मुली आपल्या आई-वडिलांकडे येत असतात तसेच बाहेरगावी नोकरीनिमित्ताने गेलेले आदिवासी बांधव आपल्या कुटुंबासहित आपल्या गावी येत असतात व होळीच्या निमित्ताने भोंगर्या बाजार भरत असतो.
भोंगर्या बाजारात ते सर्व सातपुडा पर्वतात असलेले आदिवासी बांधव पारंपारिक पद्धतीने वेषभूषा परिधान करून आपल्या कुटुंबासहित ते ढोल-ताशांच्या तालावर बाजारात नाचत येत असतात. भोंगर्या बाजारात होळी व लागणारे महत्त्वाचे साहित्य गूळ, खजूर खोबरे, व हार कंगन खरेदी करीत असतात नंतर संसार उपयोगी बाजार करीत असतात दोन वर्षापासून भोंगर्या बाजार बंद होता व या वर्षी भोंगऱ्या बाजार भरत असल्याने व्यावसायिकांची दुकान मोठ्या प्रमाणात आले आहेत गूळ, खजूर, खोबरे हार कंगण चे दुकाने मोठ्या प्रमाणात येत असतात. तसेच लहान मुलांची खेळणी असलेली दुकाने हॉटेल्स, पानटपरी, चांदीचे दुकान थाटलेले असतात. बोरद येथील भोंगर्या बाजारात हजारो आदिवासी बांधव हजेरी लावत असतात यात भोंगर्या बाजारात दोन दिवसात लाखो रुपयांची उलाढाल होत असते होळी पेटल्यानंतर होळी मातेचे दर्शन घेऊन ते आपापल्या गावी जात असतात. सातपुड्यातील आदिवासी तरुण-तरुणी नवनवीन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवित भोंगर्या बाजारात येत असतात जुनी म्हण आहेत की होळी उत्सव आतच मुली पाहण्याचे काम होत असेल असे जुने आदिवासी बांधव सांगत आहेत या भोंगळ्या बाजारामुळे तालुक्यात चैतन्याचे वातावरण पसरले आहे.



