गुन्हेगारी
मालपुर येथे जिल्हा परिषद शाळेत एका अज्ञात व्यक्तीने नळाची केली चोरी
मालपुर (गोपाल कोळी) शिंदखेडा तालुक्यातील मालपुर जिल्हा परिषद शाळा मध्ये पाण्यांची टाकीचे लोखंडी नळाची चोरी करण्याचे प्रकार उघडकीस आल्याने शाळा नं१ चे मुख्याध्यापक चौधरी व उपशिक्षक संजय बैसाणे यांनी संताप व्यक्त करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या जि.प शाळेत दोन वर्ग खोल्यांचे काम चालू असल्यामुळे प्रवेशद्वार उघडेच ठेवावे लागते. मागे एकदा चोरी झाली होती मात्र तेव्हा मुख्यध्यापकांनी स्वखर्चाने नळ बसविले होते. परंतु आज पुन्हा चोरी झाल्याचे आढळुन आल्याने शिक्षक लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरी पत्रकारांना पाचारण करण्यात आले व पंचांच्या समवेत निर्देशनात आणुन दिले. यापुढे असे प्रकार आढळून आले तर कायदेशीर कारवाई केली जाईल.