महाराष्ट्र
भदाणे यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी ; दोषींवर कारवाई
धुळे (विक्की आहिरे) शहरातील जेलरोडवर आंदोलन करणारे सुधान्त भदाणे यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेची चौकशी करून त्यात दोषी असणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
शहरातील जेलरोडवर सुधन्वा भदाणे व त्यांच्या पत्नी आंदोलनाला बसले होते. दोन दिवसांपूर्वी सुधन्वा भदाणे यांचा मृत्यू झाला. याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले की, ही घटना दुर्दैवी आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागण्या कोणत्या विभागाशी संबंधित होत्या. त्या विभागाने नेमके काय केले याची चौकशी करण्यात येईल. तसेच कोणी दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी सांगितले.