जळगावात बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
जळगाव (प्रतिनिधी) वीज बिलाच्या वसुलीवरून सध्या राज्यभरात संतापाचं वातावरण आहे. त्यातून काही अनुचित प्रकारही घडत आहेत. जळगावात बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. थकीत वीजबिल वसुली करण्यासाठी गेलेले महावितरणचे अभियंता, कर्मचाऱ्यांना गुरुवारी दुपारी १.३० वाजता सिंधी कॉलनीत प्राैढाने मारहाण केली. डोक्यात कृषी अवजार (टिकाव) मारण्याचा प्रयत्न झाला.
सहायक अभियंता जयेश रजनिकांत तिवारी यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिवारी हे दीक्षितवाडीतील पावर हाऊस येथे नोकरीस आहेत. गुरुवारी दुपारी ते कार्यालयीन सहायक योगेश जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ आत्माराम धना लोंढे, तंत्रज्ञ मधुकर कांबळे व कंत्राटी कर्मचारी गणेश जगन्नाथ नन्नवरे यांच्यासोबत सिंधी कॉलनी परिसरात थकीत वीजबिल वसुली व सूचना करण्यासाठी गेले होते. या वेळी संंतोषी माता मंदिराजवळील टिकमदास परमानंद पोपटानी यांच्या नावाने असलेल्या वीजमीटरचे २४६० रुपये बिल गेल्या ७५ दिवसांपासून थकबाकी भरले नव्हते.
जळगावातील सिंधी कॉलनीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या अभियंत्याच्या डोक्यात टिकाव घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
त्यांनी पोपटानी यांना वीजबिल भरण्यास सांगितले. याचा राग आल्याने पोपटानी यांनी घरातून चक्क खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टीकाव आणला व शिवीगाळ करत तिवारी यांच्या डोक्यात टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अभियंता तिवारी यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित टिकमराम पोपटानी याला अटक केली आहे. होत आहे.