गुन्हेगारी
शिवसेना आमदारांच्या पत्नीने केली आत्महत्या !
मुंबई : कुर्ला विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी मंगेश कुडाळकर यांनी आज राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे.
आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. रजनी कुडाळकर यांनी आत्महत्या का केली? याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण त्याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मतदारसंघातील नागरीकांना धक्का बसलेला आहे. कुर्ल्याच्या नेहरु नगर परिसरात कुडाळकर कुटुंब वास्तव्यास आहे. तेथील राहते घरी रजनी कुडाळकर यांच्या आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडालेली आहे.