महाराष्ट्र

योगेश नानकर कडून सैन्य दलाच्या युवकांना मोफत प्रशिक्षण

आर्वी (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील आर्वी हे गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३वरील मुख्य बाजारपेठ चे गाव आहे आर्वी हे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रासह धुळे तालुक्यात प्रसिद्ध आहे येथून नेहमीच प्रचार प्रसारसह शासनाच्या विविध योजनांचा शुभारंभ देखील आर्वीतून होत असतो. असाच एक अनोखा प्रयोग आर्वी येथील रिटायर्ड फौजी योगेश नानकर यांनी मोफत सैन्य दलाचे पोलिस प्रशिक्षण सुरु केले. या प्रशिक्षाला धुळे तालुका सह साक्री तालुक्यातील मालेगाव तालुक्यातील अशा विविध गावांमधून तरुणांची मोठी रेलचेल असते.

याबाबत असे की, आर्वी येथील सैनिक योगेश नानकर गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त होण्याचा आनंद आणि दुसरीकडे मात्र त्याची पत्नी दवाखान्यात मृत्यू शी झुंज देत होती. अशातच पत्नीचे निधन झाले एवढ्या दिवस भारत मातेची सेवा करून सेवा सेवानिवृत्ती आनंद असताना नियतीचा खेळ मात्र वेगळाच होता. एवढ्या साऱ्या गोष्टी घडून देखील खचून न जाता आपण या समाजांचे काही तरी देणं लागतो. म्हणून योगेश नानकर यांनी गेल्या दोन वर्षांपासून आपल्या गावातील परिसरातील युवकांना मोफत सैन्य दलाचे पोलिस प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. योगेश नानकर ज्या वेळी सैन्य दलात भरती झाले. त्यावेळी त्यांच्या घराची परिस्थिती अतिशय नाजूक होती अशा परिस्थितीत देश सेवा करण्याचा मानस त्यांच्या मनात होता. परिस्थिती शी झुंज देत सैन्य दलात भरतीझाले आनंद खूप मोठा सुरुवातीला पाहिजे तसा प्रतिसाद युवकांकडून मिळाला नाही. परंतु, गेल्या वर्षभरापासून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय.

या प्रशिक्षणामधे दर रविवारी चारशे पाचशे सोहळाशे मीटर धावण्याचे प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा म्हणून चाचणी घेणे त्यामध्ये सैन्य दल पोलिस यामध्ये विचारले जाणारे प्रश्न विषयी चाचणी घेणे लांब उडी उंच उडी लेखी आणि तोंडी परीक्षा घेतली जाते. त्यात प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना व्यायामाचे कपडे बुट तसेच स्पर्धा परीक्षा सराव साठी पुस्तके त्यांच्या कडून मोफत ते ही गावातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन भेट देतात संपूर्ण खर्च मात्र त्याचा असतो बर्याच ठिकाणी लोकांनी सैन्य दल पोलिस प्रशिक्षण साठी मुलांकडून हजारो फी घेवून प्रशिक्षण दिले जाते. येथे मात्र सर्व काही मोफत गेल्या महिन्याभरा पूर्वी रनिंग धावण्याचा महामुकाबला ठेवला होता. तेव्हा हजारो युवकांनी सहभाग नोंदविला होता. धावण्याच्या स्पर्धेत अगदी लहान मुलांपासून ही स्पर्धा घेतली जाते. या मोफत प्रशिक्षणातून किमान दहा मुलें जरी सैन्य दलात किंवा पोलिस भरतीमध्ये गेले तर खरा जीवनाचा आनंद आणि खरी माझ्या पत्नीला श्रद्धांजली अर्पण होईल आणि खरी देश सेवा केल्याचा देखील मोठा आनंद होईल, असे सेवानिवृत्त फौजी योगेश नानकर यांनी प्रशिक्षण दरम्यान सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे