गुन्हेगारीजळगाव जिल्हा

८ धाडी, जुगार, सट्टा चालवणारे आणि खेळणारे १५ आरोपी पकडले

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील ८ ठिकाणांवर पोलिसांनी सलग धाडी टाकून जुगार आणि सट्टा चालवणारे आणि खेळणारे जवळपास १५ आरोपी पकडले आहेत . पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

शहरातील सिंधी कॉलनी, शनीपेठ परिसर, रिधूर वाडा आणि शिरसोली जकात नाक्याजवळील शेतात पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी आज दुपारी धडक कारवाई करत सट्टा व जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई केली पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे. गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते.

जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेतनदास मेहता हॉस्पीटलच्या बाजूला एका दुकानावर, शनीपेठ परिसरात दोन ठिकाणी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिरसोली रोडवील जकात नाक्याजवळील शेतात सट्टा व जुगार सुरू असल्याची गोपनिय माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना मिळाली होती. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे स्वत: कारवाईसाठी मैदानात उतरले होते. सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकातील पोलीस कर्मचारी यांनी सलग ८ ठिकाणी धडक कारवाई करत १५ जणांना ताब्यात घेतले आहे. संशयित आरोपींकडून रोकड, सट्टा व जुगार खेळण्याचे साहित्य आणि मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत

स्थानिक गुन्हे शाखेचे पोना नितीन बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून सिंधी कॉलनी , भाजी मार्केट येथे छापा टाकून पकडलेल्या आरोपींच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नरेश गणपत भाट (वय 50) व राज सुरेश भाट (वय 24 , दोघे रा – सिंगापुर कंजरवाडा) अशी या आरोपींची नावे आहेत . धाडीत सट्टा जुगाराच्या साहित्यासह 3310 रुपये रोख नरेश भाट आणि 2920/- रुपये रोख राज भाट याच्या ताब्यातून जप्त करण्यात आले . पळुन गेलेले गजानन वसंतराव लकडे ( रा. चंदनवाडी शनीपेठ ) आणि राजेश’तनवाणी ( रा. सिंधी कॉलनी ) अशी अन्य आरोपींची नावेही त्यांनी सांगितली

जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पो ना विजय पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , पो नि किरणकुमार बकाले यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंबेडकर मार्केटच्या पाठीमागे , अशोक गॅरेजच्या बाजूला सुरु असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत आकडे लिहून घेणारे शेख महेबूब शेख अय्याज ( रा – नशिराबाद ) आणि समाधान राठोड ( रा – सुप्रीम कॉलनी ) या आरोपींना अटक करण्यात आली . सट्ट्याच्या साहित्यासह त्यांच्या ताब्यातून रोख ४१ हजार ७०० रुपये जप्त करण्यात आले . त्यांनी त्यांच्या अड्ड्याच्या मालकाचे नाव विजय मधुकर चौधरी ( रा – जळगाव ) असल्याचे सांगितले . या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

एम आय डी सी पोलीस ठाण्यात पो कॉ सतीश गर्जे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , पो नि प्रताप शिकारे यांच्या सूचनेवरून त्यांच्यासह पो उ नि रवींद्र गिरासे , हे कॉ सचिन मुंडे , मिलिंद सोनवणे यांनी आर एल चौफुलीजवळच्या नेकसा शो रूमच्या मागच्या भागात चालू असलेल्या सट्ट्याच्या अड्ड्यावर धाड टाकली या कारवाईत आकडे लिहून घेणारा आरोपी भगवान मुरलीधर चौधरी ( रा – रामेश्वर कॉलनी ) याला ताब्यात घेण्यात आले . त्याच्या झडतीत त्याच्या ताब्यातून सट्ट्याच्या साहित्यासह रोख २३१० रुपये जप्त करण्यात आले . आपण हा अड्डा अमोल सुपडू सपकाळे ( रा – रामेश्वर कॉलनी ) याच्या सांगण्यावरून चालवत असल्याचे त्याने सांगितले. या दोघांच्या विरोधात एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे