चोपडा

पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान अक्षम्य त्रूटी, याला पंजाब सरकार जबाबदार ; भाजपा व युवा मोर्चाच्यावतीने निषेध करत तहसीलदारांना निवेदन

चोपडा (विश्वास वाडे) पंजाब सरकार कडून पंतप्रधानांचे राजकीय सभेच्या दौऱ्याच्या निमित्ताने अक्षम्य त्रूटी झाली ही देशाच्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षितता साठी गंभीर बाब आहे. देशाने अश्या सुरक्षा त्रूटीमुळे या पूर्वी दोन पंतप्रधानांना गमविले आहेत. यांचे भान न ठेवता निव्वळ राजकीय द्वेषापायी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ताफा कुठलीही पुर्व सुचना न देताच वीस मिनिटे पंजाबमध्ये फ्लायओव्हर ब्रिजवर कोंडी करून रोखण्यात आला. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी हे फोनही स्विकारत नव्हते या वरून पंतप्रधानांचे जीविताला धोका निर्माण करण्याचे हे कृत्य जाणून बुजून करण्यात आल्याचे प्राथमिक स्वरूपात दिसून येत असलेने यास सर्वस्वी पंजाब सरकार व पंजाब पोलीस जबाबदार आहेत त्यांचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत तालुका अध्यक्ष पंकज पाटील व शहर अध्यक्ष गजेंद्र जैसवाल यांचे हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणाचे बाबतीत महाविकास आघाडी सरकारच्या उदासीन व निष्काळजीपणा भूमिकेमुळे ओबीसी समाजाचे आरक्षण स्थगित झालेने जो ओबीसी वर अन्याय होत आहे तो त्वरित थांबला पाहिजे. अश्या आशयाचेही निवेदन तहसीलदार यांना तालुका भारतीय जनता पार्टी व ओबीसी मोर्चा च्या वतीने ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष प्रविण चौधरी, ओबीसी तालुका अध्यक्ष कांतीलाल पाटील, ओबीसी शहर अध्यक्ष सुरेश चौधरी यांचे हस्ते देण्यात आले.

सदर निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे की, गेल्या सहा महिन्यात राज्यात 52 टक्के ओबीसी असताना न्यायालयात भक्कम बाजू ओबीसीसाठी न मांडता सात जिल्हा परिषद व 106 नगर पंचायतीच्या निवडणुका या ओबीसीचे आरक्षणा शिवाय घेण्यात आलेने यापुढे ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत कुठलीही निवडणूक घेऊ नये. तसेच राज्याचे मविआ सरकार मधते मंत्री असलेले जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी समाज हा ब्राम्हण वाद्यांचा पगडा असलेला समाज आहे , या समाजाचा संघर्षाचा कोणताही ईतिहास नाही. त्या मुळे ओबीसी समाजावर फार विश्वास नाही. अशी अभद्र टीका करून ओबीसी समाजाला डीवचण्याचे काम महाविकासआघाडी सरकार करीत आहे. महाविकासआघाडी सरकारने जितेंद्र आव्हाड यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा.

निवेदन देतांना युवा मोर्चा ता अध्यक्ष प्रकाश पाटील, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर चौधरी, अनुसूचित जाती शहर उपाध्यक्ष सागर काविरे, सरचिटणीस सुनिल सोनगिरे, सरचिटणीस मनोहर बडगुजर, सरचिटणीस हेमंत जोहरी, बुथ सहयोजक विजय बाविस्कर ,आदिवासी प्रदेश सदस्य पिंटु पावरा, कार्यालय मंत्री मोहीत भावे, योगराज पाटील, तालुका उपाध्यक्ष दिनकर ठाकरे, मनोज सनेर, अशोक लक्ष्मण पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे