म्हसावद गावांत एटीएम नसल्याने नागरिकांची गैरसोय ; बँक व्यवस्थापकांची बघ्याची भूमिका
जळगाव : तालुक्यातील म्हसावद गावातील दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या व आजूबाजूला असणारे ५० खेडे व बाजारपेठेचे गाव. या बाजारपेठेत होणारे दैनंदिन व्यवहार लाखो कोटीने च्या घरात असणारे व्यवहार हे हजार’ हजार ‘रुपयांच्या माध्यमातून स्मार्ट फोन द्वारे होताना दिसत आहे.
विशेष गावात दोन बँक कार्यरत आहेत. एक “महाराष्ट्र ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँक “अशा दोन शाखा असून या दोन्ही शाखांचे गावात ए टी एम केंद्र नाही. या ए टी एम केंद्र अभावी सर्वसामान्यांचे हाल होताना दिसत आहे. गावातील काही व्यापारी मंडळींना पैसे काढण्यासाठी अक्षरशा: एरंडोल,शिरसोली किंवा जळगाव यावे लागते.तर बँक व्यवस्थापकांना काही व्यापारी मंडळींनी ए टी एम केंद्राची मागणी केली होती. मात्र व्यवस्थापकांनी बघ्याची भूमिका घेऊन पाठ फिरवलेली दिसुन येत आहे. असे नागरिकांन कडुन बोलले जात आहे.
तसेच गावात महाराष्ट्र ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापकांन कडून गावातील व ५०खेड्याच्या सर्वसामान्य नागरिकांना सहकार्य ची भावना लाभत नसल्याने सर्वसामान्यांकडून नाराजीचा सूर उमटला जात आहे .तरी बँकेच्या व दैनंदिन व्यवहारासाठी ए टी एम केंद्र नसल्या अभावी. लोकांची गैरसोय होताना दिसत आहे. तरी जळगाव भारतीय स्टेट बँक चे महाप्रबंधक व औरंगाबाद येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक यांनी तातडीने ए टी एम केंद्राची सुविधा सर्वसामान्य नागरीकांना उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.